शिशुवाटिका (नर्सरी) प्रवेश मागणी अर्ज शनिवार दि. १ मार्च २०२५ ते पुढील सूचना येई पर्यंत या कालावधीमध्ये उपलब्ध राहतील.



शिशुवाटिका (नर्सरी) - प्रवेश प्रक्रियेची माहिती


आपल्या पाल्यास चांगले शिक्षण देण्यासाठी आपण आमच्या शाळेची निवड केली याबद्दल आपले धन्यवाद....! माहिती साठी संपर्क क्रमांक : ९६८९१७१२९०, ९४२२०६९१५७


शाळेत प्रवेश कसा मिळेल ?

  • आमच्या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा लागेल,हा अर्ज मराठी भाषेतच भरावा. जर आपल्याकडे मराठी टायपिंग उपलब्ध नसेल तर त्यासाठी गुगल मराठी इनपुट टूल वापरावे तिथे मराठी टायपिंग करून अर्जावर कॉपी - पेस्ट करावे.

  • शासन निर्णयानुसार ज्यांचा जन्म दिनांक दि. १ जानेवारी २०२२ पासून दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे त्यांनाच अर्ज भरता येईल.

  • अर्जामध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न इ. संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक राहील.

  • ही माहिती भरून झाल्यावर अर्ज भरणे व छापणे हे बटन क्लिक करावे लागेल. त्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट काढावी लागेल.

  • छापील अर्जासोबत खालील कागदपत्रांची स्वसाक्षांकीत (self attested) प्रत जोडावी लागेल.

  • 1. बालकाचा जन्मदाखला     2.रेशनकार्ड    3. दोन्ही पालकांचे व असल्यास पाल्याचे आधारकार्ड.
  • छापलेल्या अर्जावर अर्जक्रमांक दिलेला असेल. तो अर्जक्रमांक आपल्याकडे लिहून ठेवावा. अर्जाची फी रु. ५००/- ( पाचशे मात्र ) आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडलेला छापील अर्ज शाळेच्या कार्यालयात
    सोमवार दि. १० मार्च २०२५ ते बुधवार दि. १२ मार्च २०२५ या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत (सकाळी ०९:३० ते ११:३०) दाखल करावा.

  • वरील कालावधीमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर आपला अर्ज निवड प्रक्रियेमधे समाविष्ट केला जाईल.

  • आपला अर्ज निवड प्रक्रियेमध्ये समाविष्ट केला म्हणजे आपला प्रवेश निश्चित झाला असे नसून बालकाची वयोमर्यादा, अर्जात भरलेली सर्व माहिती, सोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून मगच प्रवेश निश्चित केला जाईल.

  • प्रवेश प्रक्रिया नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र शासन यांच्या वेळोवेळी निर्गमित झालेल्या नियमांना अनुसरूनच होईल.

प्रवेशपात्र झालेल्या पाल्यांची यादी शाळेच्या संकेत स्थळावर तसेच शाळेतील सूचना फलकावर जाहीर केली जाईल.

आमच्या असंख्य पालकांच्या आग्रहावरून तसेच त्यांच्या सोयीसाठी आता ऑनलाईन पेमेंटची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्जाची प्रिंट काढताना कोणी पैसे घेतले तर त्याला शाळा जबाबदार राहणार नाही.